नवी दिल्ली – करोनाचे संकट असतानाच आणखी एका विषाणूने तोंड वर काढल्याचे बघायला मिळाले आहे. झिका विषाणूचे रुग्ण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण काल केरळ मध्ये मिळाला होता. दरम्यान आज या विषाणूचे केरळ मध्ये 13 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
केरळमध्ये एक २४ वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणूने बाधित झाली असल्याची माहिती केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली होती. याचबरोबर तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी 19 संशयित रुग्ण होते. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 जणांचे नमुने झिका पॉझिटीव्ह आढळले.
केरळात झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर अॅलर्ट जारी करीत केंद्र सरकारने सहा तज्ञांचे पथक केरळमध्ये पाठवले आहे. तेथील झिकाच्या फैलावावर लक्ष ठेवण्याबरोबरच केरळ सरकारला मदत करण्यासाठी हे पथक सक्रिय राहणार आहे. पथकामध्ये सार्वजनिक आरोग्य क्षेत्र तसेच साथरोगाचे तज्ञ आणि एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश असेल.
झिका व्हायरसचे लक्षण
झिका व्हायरसला बळी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. पाचपैकी एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू होतो. किरकोळ ताप, डोळे लाल होणारे, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशा प्रकारच्या तक्रारी व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या येतात. प्रत्यक्षात खूपच कमी प्रमाणात होणार्या नर्व्हस सिस्टिमचा हा एक आजार मानला जातो. तज्ञ या प्रकाराला गुलीयन बार सिंड्रोम असेही म्हणतात. या कारणामुळे लकवासुद्धा येऊ शकतो. आजघडीला झिका व्हायरसवर कोणताच उपचार निश्चित नाही. तसेच ठोस औषध देखील शोधले गेलेले नाही. त्यामुळे झिका व्हायरच्या रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचे आणि आराम करण्याचा सल्ला दिला जातो.
झिकाच्या रुग्णांपुढे सर्वात मोठे आव्हान म्हणजे गर्भात वाढणार्या बाळाचे आरोग्य. हा व्हायरस गर्भात वाढणार्या मुलांंत मायक्रोसेङ्गाली नावाचा आजार बळावू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, झिका व्हायरसमुळे होणार्या मायक्रोसेङ्गाली आणि गिलीयन बार सिंड्रोमसारखे आजार होतात. या व्हायरसला बळी पडलेल्या काही मुलांच्या मेंदूत हा व्हायरस आढळून आला आहे. अनेक मुलांच्या नाळेतही हा व्हायरस आढळून आला आहे.