मुंबई – धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ज्येष्ठ कन्या ईशा देओल लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. स्वतः ईशा देओलने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
अजय देवगणची वेबसिरीज “रुद्र – एज ऑफ डार्कनेस’मधून ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. “रुद्र’ ही माझी पहिली वेबसिरीज आहे. तीदेखील अजय देवगणसारख्या शानदार अभिनेत्याबरोबर असणार आहे.
अजयबरोबर आपण पूर्वी काम केलेले आहे, असे ईशाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ईशा देओलने बॉलीवूड सोडून गेल्या दशकभरापासून ती आपल्या संसारामध्ये रमली आहे.
“रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून ती ऍक्टिंग करिअरमध्ये कमबॅक करणार आहे. या वेबसिरीजमध्ये ती अजयच्या गर्लफ्रेंडचा रोल करणार आहे. या कमबॅकबद्दल ती खूप खूश आहे.
केवळ छान दिसण्यापेक्षा एक कलाकार म्हणून काही नवीन करण्याची संधी मिळेल, अशाच रोलची आपल्याला कमबॅकसाठी गरज होती.
तसाच हा रोल आहे, म्हणून आपण स्वीकारल्याचे तिने सांगितले. “रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ ही वेबसिरीज ब्रिटिश सायकोलॉजिकल ड्रामा “ल्युथर’चे हिंदी रूपांतर आहे.