- 220 बाधितांची नोंद
- 235 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये आज किंचित वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत दोनशेच्या आत असलेल्या रुग्णसंख्या आज 220 झाली. असे असले तरी मृतांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. शहरात गेल्या 24 तासांत एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर मागील चार बाधितांची आज नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी (दि. 19) शहरात 220 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 55 हजार 130 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 5 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील 1 जणांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4249 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 235 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 705 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3841 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 927 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 249 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1176 इतकी आहे.