बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच कोणत्या-न-कोणत्य कारणांमुळे चर्चेत असतो. आता ऋतिकने पुन्हा मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने पुन्हा एकदा सिने एंड टीव्ही स्टार असोसिएशन (सिंटा) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
ऋतिक रोशनने असोसिएशनला 20 लाख रुपयांची देणगी दिली असून दारिद्र रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या 5 हजार सदस्यांना होणार आहे.
करोनाच्या या संकटकाळात हृकित गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर करोनाच्या पहिल्या लाटेतदेखील ऋतिकने सिंटासाठी मदत केली होती.
त्यावेळी त्याने 25 लाखाची आर्थिक मदत केली होती. त्याने केलेल्या या मदतीमधून सुद्धा 4 हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती. या व्यतिरिक्त ऋतिककडून अनेक प्रकारे मदत कार्य सुरू आहे.
मुंबई पोलिसांसाठी हॅंड सॅनिटाइजर्सपासून ते फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान याबरोबरच करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि कॉसेंट्रेटर्सपर्यंत, तो गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत आहे.
ऋतिककडून करण्यात आलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानण्यात आले आहेत. या पुढाकाराविषयी ऋतिक रोशनचे आभार मानताना सिंटाचे महासचिव अमित बहल म्हणाले, ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती.
यावेळी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या 5000 सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.