- 15 लाखांची वैद्यकीय उपकरणे भेट
- महालक्ष्मी मरीआई माता मंदिर, नगरसेवक संदीप वाघेरेंकडून मदतीचा हात
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात म्युकर मायकोसीस रुग्णांवरील उपचारांकरिता पिंपरीतील भैरवनाथ मंदिर ट्रस्ट संचालित महालक्ष्मी मरीआई माता मंदिर व नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ही वैद्यकीय उपकरणे स्वीकारली. या वैद्यकीय उपकरणांमध्ये कॅमेरा, 0 व 70 डिग्री स्कोप, एल.ई.डी. लाइट, फायबर ऑप्टिक केबल, मेडीकल ग्रेड मॉनिटर, नेक्सास एम-2 मायक्रोडीब्रायडर यांचा समावेश आहे.
पिंपरी वाघेरे येथील महालक्ष्मी मरीआई माता मंदिरातील दक्षिणा पेटीमध्ये 8 लाख 70 हजार जमा झाले होते. या रक्कमेचा उपयोग म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठी व्हावा, असा निर्णय भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार मंदिराच्या मार्फत जमा झालेली रक्कम व नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उर्वरित 6 लाख 30 हजारांची भर घालत, एकूण 15 लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे महापालिकेस भेट देण्यात आली. ही वैद्यकीय उपकरणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वापरासाठी देण्यात आली आहेत. यासाठी वायसीएम रुग्णालयाचे डॉ. अनिकेत लाठी, डॉ. परमानंद चव्हाण व डॉ. सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, आयुक्त राजेश पाटील भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गणपत वाघेरे, अतिरक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वस्ताद दत्तोबा नाणेकर, किसन कापसे, जयवंत शिंदे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, अंकुश वाघेरे, सुदाम नाणेकर, पोपट महाराज इंगळे, रामभाऊ वाळूंजकर, मनोहरबुवा सुभेकर, अंकुश कापसे, रामभाऊ कुदळे, विजय जावळे, सीताराम भूमकर, विजय जाचक, सुरेश नलावडे तसेच महालक्ष्मी मरीआई मंदिरचे सभासद हरिष वाघेरे, अक्षय नाणेकर, किरण वाघेरे, संकेत भालेराव, शरद कोतकर, राकेश मोरे उपस्थित होते.