पुणे – ज्येष्ठ व्यक्तीने पाळलेल्या श्वानावर दहा ते पंधरा जणांच्या जमावाने दगडफेक केली. यामुळे श्वान गंभीर जखमी झाले असून कोंढवा पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रेनू स्वामीरन बॅनर्जी(64,रा.बॅनर्जी मॅन्शन शिवनेरी रस्ता, कोंढवा) यांच्या घरी दहा ते पंधरा जणांचा जमाव चालून आला होता. त्यांनी घराच्या पत्र्याच्या कंपाउंडवर दगड व बांबुने मारुन कंपाऊंड पाडले.
यानंतर घरावर दगडफेक केली. त्यांना “तुम कुत्ते क्यो पालते हो, तुम्हारे कुत्तेने एक बुढी औरत को काटा है, अब हम तुम्हे नही छोडेंगे असे म्हणत त्यांच्या कुत्र्याला दगडाने मारुन जखमी केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.