नवी दिल्ली – कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण येणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक असून त्यात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांचा समावेश नसून प्रवासासाठी अडचणी येणार असल्याबाबतची अफवा पसरली होती.
यावर केंद्रानं हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जगात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड व्यतिरिक्त इतरही लसी आहेत. प्रत्येक देश त्यांच्या स्वत: च्या मानक आणि उपलब्धतेनुसार लसींना मंजूर करतात, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतचं पीआयबी फॅक्टचेकचे ट्वीट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रिट्वीट केलंय.
जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय. पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक बनला आहे.