हडपसर: हडपसर विधानसभा मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील रुग्णांना ऑक्सीजन बेड मिळण्यास अडचणी येत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा असलेला तुटवडा याविषयी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आज मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी येथील रुग्णांना तत्काळ सुविधा मिळाव्यात अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.
शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणे ,व इतर पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करताना नगरसेवक नाना भानगिरे यांनी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी सध्या पुणे शहर आणि हडपसर विधानसभा मतदार संघात असलेल्या कोविड उपाय योजना याविषयी माहिती दिली.
तसेच आता नागरिक आम्हाला स्थानिक समस्या सांगत नाहीत किंवा त्यासाठी संपर्क करत नाहीत,तर एकतरी ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्याची विनंती करत आहेत. परंतु परिस्थितीपुढे अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही कमी पडतो आहे, अशी प्रांजळ कबुली देत नगरसेवक भानगिरे यांनी रुग्णांना तत्काळ ऑक्सीजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील असे नियोजन करण्याची विनंतीही
केली.
प्रभागात असलेली स्वतःची दोन हॉटेल ही एका खासगी रुग्णालयाच्या मदतीने कोविड रुग्णाच्या एडमिशनसाठी उपलब्ध करून देत असल्याची माहिती नगरसेवक नाना भानगिरे यांनी यावेळी दिली. तर पुणे शहरात असलेले पुणे महानगरपालिकेचे नाटयगृह, विरंगुळा केंद्र, समाज मंदिर व इतर यामध्ये कोरोटाइन सेंटर करता येतील. तसा सूचना आपण प्रशासनाला देण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली.