जकार्ता – यावर्षी जानेवारी मध्ये जावा समुद्रामध्ये कोसळलेल्या विमानाचा फ्लाईट रेकॉर्डर डाउनलोड करण्यात यश आल्याचा दावा इंडोनेशियाच्या नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी कमिटीने केला आहे. या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर च्या मदतीने विमान कोसळण्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेता येऊ शकेल. या विमान अपघातात 62 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर मध्ये विमानातील दोन तासांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे असे नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी कमिटीचे अध्यक्ष सोयल जाणतो यांनी सांगितले. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या चारही चॅनेलला डाउनलोड करण्यात आले आहे मात्र चौथे चॅनेल डाउनलोड करण्यात अडचणी आल्या. मात्र उपलब्ध घाटाच्या आधारे विमानाच्या अपघातात मागील नेमके कारण शोधले जाऊ शकेल असे ते म्हणाले.
इंडोनेशियाचे श्री विजया हेअर 182 हे विमान जकार्ता येथून निघाले होते बोईंग 737-500 या मॉडेलचे हे विमान उड्डाण केल्यानंतर थोड्याच अवधीत रडार वरून बेपत्ता झाले होते. विमान कोसळल्यानंतर तीन दिवसांनी फ्लाइट डाटा रेकॉर्डर शोधून काढला गेला होता.