Digital Voter ID : आता ऑनलाईन मिळणार मतदान ओळखपत्र; जाणून घ्या कसं करायचं ‘डाऊनलोड’

Digital Voter ID – आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणेच आता मतदान कार्डही ऑलनाईन डाऊनलोड करता येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनादिवशी डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter ID) जारी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) देण्यात आली आहे. 25 जानेवारीपासून अधिकृतपणे डिजीटल मतदान कार्ड जारी केले जाणार आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाॅंडिचेरी या पाच राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच मतदारांना डिजीटल वोटर आयडी मिळणार आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाला डिजीटल वोटर आयडी मिळेल का नाही हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारीदरम्यान नव्या मतदारांना डिजीटल मतदान कार्ड उपलब्ध होणार आहे. तसेच मोबाईल नंबर रजिस्टर असणारांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल मतदान कार्ड मिळणार आहे.

मतदान कार्डची पीडीएफ फाईल मिळणार –

डिजीटल मतदान कार्ड हे पीडीएफ स्वरूपात मिळणार असल्याची माहिती आहे. डिजीटल मतदान कार्डवर मतदाराच्या माहितीसह क्यूआर कोड असणार आहे. डिजीटल मतादन ओळखपत्र मिळविण्यासाठी मतदारांना मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीच्या सहाय्याने निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर अकाउंट तयार करावे लागणार आहे. त्यानंतर ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.