रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यात मागील २४ तासात २९४ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. वर्षभरातील आतापर्यंतच्या आकडेवारीतील २४ तासातील ही सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यात करोना समूह संसर्गाचा हाहाकार उडाल्याने भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यात एकाच दिवशी २९४ जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात हाहाकार उडाला आहे. समूह संसर्ग पसरू लागल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोना साखळी तोडण्याचे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरु असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील नागरिक करोनाचे शिकार बनत असून दिवसागणिक संख्या वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आता संख्या वाढल्याने मृत्युदरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील चाकण आळंदी राजगुरूनगर नगर परिषदा व त्या जवळील गावांमध्ये करोनाचा समूह संसर्ग सुरु आहे. खेड तालुक्यात २४ तासात चाकण ५०, आळंदी १८, राजगुरूनगर ३३ या नागरपरिषदांसह मेदनकरवाडी २८, नाणेकरवाडी २०, चऱ्होली खुर्द १०, चिंबळी १०, कडाचीवाडी १४, खराबवाडी १२, चांडोली ४, कडूस २, वडगाव पाटोळे १, आंबेठाण ६,बोरदरा १, खालूंब्रे १, कुरूळी ३, म्हाळुंगे ७, मोई २, निघोजे ५, शिवे १,वासुली २, वाकी खुर्द १, पाईट १, कोरेगाव बुद्रुक ६, कुरकुंडी १, किवळे १, होलेवाडी १, जैदवाडी १, खरपुडी खुर्द १,
मांजरेवाडी १, राक्षेवाडी १, सांडभोरवाडी २, सातकरस्थळ २, शिरोली १,तिन्हेवाडी १, वाकी बुद्रुक २. भोसे ७, गोलेगाव १, काळूस ३, केळगाव २, रासे २, शेलगाव १, शेलपिंपळ्गाव ५, सोळू २, वडगाव घेणंद २, वाडा १, कडधे २, दावडी १ गुळाणी १, कनेरसर २, निमगाव ४, वरुडे २, वाफगाव ३ असे तीन नगरपरिषदा व ५० गवे मिळून २९४ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीन मधील खेड तालुक्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.