Corona In India | देशातील करोनाची स्थिती चिंताजनक! नवीन रूग्णांची संख्या लाखाच्या दिशेने

नवी दिल्ली – देशात करोना रूग्णांची संख्या सध्या लक्षणीयरित्या वाढताना दिसते आहे. काल दिवसरभरात देशात करोनाचे 93 हजार 249 नवीन रूग्ण आढळून आले असून ही संख्या आता झपाट्याने दैनंदिन लाखाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

रविवारी एका दिवसात देशभरात करोनामुळे 513 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 64 हजार 623 इतकी झाली आहे.

देशभरात गेल्या सतत 25 दिवसांत करोना रूग्ण संख्येचा वाढता आलेख दिसून आला असून या 25 दिवसात एकूण 6 लाख 91 हजार 597 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण देशातील एकूण करोना रूग्णांच्या तुलनेत 5.54 टक्के इतके आहेत. करोना रूग्ण दगावण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.