जळगाव – आपल्याला झालेला करोना हा ईडीच्या तारखा पाहून झालेला नाही, असा खोचक टोला भाजप आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे. खडसे साहेबांना ईडीची तारीख आली की, लगेच करोना होतो. आणि ते खाजगी दवाखान्यात जातात किंवा घरी कॉरंटाइन होतात. आणि मग मुंबई बाहेर फिरतात, अशीही टीका महाजन यांनी केली.
गिरीश महाजन यांच्या खोचक टीकेला खडसे यांनीही तत्काळ उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मला अशा स्वरूपाची नौटंकी जमत नाही. करोनामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. मला करोनात किती त्रास होतो याची जाणीव आहे.
महापालिका हातातून गेल्यामुळे गिरीशभाऊंना जो झटका बसला त्यामुळे त्यांना ईडी बीडी आठवत आहे. ईडी लावून तुम्ही छळता हे जगाला माहित आहे. म्हणून तुम्हाला वारंवार ईडी आठवते असा टोला खडसे यांनीही लगावला आहे.