सातारा – जिल्ह्यात मंगळवारी 383 जणांचे अहवाल करोना बाधित आले आहेत. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
तीन बाधितांचा मृत्यू
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 51 वर्षीय पुरुष (वाई ), 55 वर्षीय महिला (गोपूज ता. खटाव) व 80 वर्षीय पुरुष (झोरे ता. जावळी) अशा एकूण तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 404270
एकूण बाधित – 65542
घरी सोडण्यात आलेले – 59997
मृत्यू – 1906
उपचारार्थ रुग्ण – 3639