अमिराती -अमिरातीत सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्स 50 मीटर पिस्तूल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदक पटकावले व नवा स्पर्धा विक्रम नोंदवला.
या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. मनीषने 229.1 गुण नोंदवले.नरवालशिवाय इराणच्या सारेह जवानमार्डीने 223.4 गुण मिळवले. तर, सिंगराजने 201.7 गुणांसह ब्रॉंझपदक जिंकले.
स्पर्धेत युक्रेनने चार सुवर्ण, चार रजत तर एक ब्रॉंझपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. यजमान अमिरातीने तीन सुवर्ण व एक रजतपदकासह दुसरे स्थान राखले आहे.
भारताने दोन सुवर्ण, एक रजत तर, एक रजतपदकांसह तिसरे स्थान मिळवले. अल एन येथील नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 24 देशांतील 120 खेळाडूंनी भाग घेतला आहे.