पाचगणी – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजता रुग्णवाहिकेने चार वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खेड येथील रुग्णवाहिका रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन आली होती. ही रुग्णवाहिका वाई घाटातून पहाटे पाचगणीमध्ये आली.
येथील शिवाजी चौकात पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या चार वाहनांना या रुग्णवाहिकेने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, वाहनांच्या मागील बाजूने चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे.