मुंबई – जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांना आधार लिंक असणं गरजेचं आहे. आज आधार कार्ड शिवाय सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. केवळ ओळखपत्र म्हणूनच नव्हे तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे अनिवार्य बनले आहे.
अब आप अपने नजदीकी डाक घर में आधार कार्ड का नामांकन या अद्यतन कर सकते है। अधिक जानकारी के लिए, देखें: https://t.co/8tbCDmSkMv
You can now enrol or update Aadhaar Card at a post office near you. To know more, visit: https://t.co/8tbCDmSkMv#DigitalDostIndiaPost pic.twitter.com/vvj6ECobqf
— India Post (@IndiaPostOffice) March 16, 2021
राशन कार्ड , पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे. म्हणूनच आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे तयार करता येते. याबरोबर आता इंडिया पोस्टने आधार कार्डची नोंदणी किंवा अपडेशन करण्याची सुविधा सुरु केली आहे. या बाबत त्यांनी ट्विट केले आहे.
पुढील प्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड तयार करू शकता -: आपली आधार माहिती अद्ययावत झाल्यास त्याकरिता आपल्याला चार्ज द्यावे लागेल. प्रत्येक वेळी माहिती अद्ययावत केल्यावर याची किंमत 50 रुपये आहे.
अशी करा आधार कार्डची डिजिटल कॉपी अशी डाउनलोड करा
आता जेव्हा आपल्याला वेबसाइटवरून आपले आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल किंवा कोणतीही माहिती अद्यतनित करायची असेल तर, यावेळी, स्मार्टफोनवर दिसणारा टीओटीपी वापरता येईल. त्यानंतर आधार तुम्ही डाउनलोड करू शकतात.