- देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड
देहूरोड – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीपदी वर्णी लागण्यासाठी देहूरोड परिसरातून बारा जणांचे अर्ज सोमवारी (दि. 15) सायंकाळपर्यंत बोर्डाला प्राप्त झाले होते.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डसह देशातील 56 कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आले होते. कॅंटोन्मेंट कायदा 2006 तील तरतुदीनुसार बरखास्त बोर्डाची निवडणूक अशक्य असल्यास निवडणूक होईपर्यंत त्रिसदस्यीय समितीद्वारे प्रशासनाचा कारभार चालावावा, असे निर्देशित आदेश बुधवारी (दि. 10) सायंकाळी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला प्राप्त झाले होते.
त्रिसदस्यीय समितीमध्ये बोर्डाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व एक केंद्र सरकारद्वारा नियुक्ती लोकप्रतिनिधी (शासकीय व्यक्ती/कर्मचारी नसावा) यांचा समावेश असलेले समिती स्थापन करण्यासाठी नामनिर्देशित सदस्यांचा अर्ज मागे मागविला होता. यामध्ये सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत बारा जणांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये हाजीमलंग मारिमुत्तू, ऍड. अरुणा पिंजण, ऍड. कैलास पानसरे, ऍड. कृष्णा दाभोळे, ऍड. प्रवीण झेंडे, रमेश जाधव, भरत नायडू, डॉ. शालक अग्रवाल, सुनंदा आवळे, अशोक शेलार, वसंत झेंडे, सागर लांगे असे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी दिली आहे.