सातारा – जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 159 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर एका बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
माहितीनुसार, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोल्हापूर नाका (ता. कराड) येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एकूण नमुने – 365865
एकूण बाधित – 60476
घरी सोडण्यात आलेले – 56615
मृत्यू – 1869
उपचारार्थ रुग्ण – 1992