नवी दिल्ली – दिल्लीत संसद भवन परिसराच्या सुशोभीकरणात अनेक नवीन बांधकामे केली जात असून त्याच्या आराखड्यात आता बदल करून नवीन संसद भवन परिसरात आता पंतप्रधानांसाठीही नवीन कार्यालय उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे.
दिल्ली विकास प्राधिकरणाकडून त्यासाठीचा नवीन आराखडा सादर करण्यात आला आहे. प्रत्येकी साडे नऊ एकराच्या दोन प्लॉट्सच्या वापरातील बदलासाठीचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून गेल्याच आठवड्यात त्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. मोतीलाल नेहरू मार्ग ते के कामराज मार्ग या दरम्यानच्या जमिनीवर आता हे नवीन पीएमओ तयार होत आहे.
त्यासाठी या दोन्हीं प्लॉट्सची जमीन वापरण्यात येणार आहे. त्याची एकूण जागा ही 19 एकर इतकी आहे. त्या खेरीज अन्यही जमीनीच्या वापराच्या आराखड्यातही काहीं बदल सुचवण्यात आले आहेत. यात पंतप्रधानांसाठीच्या नवीन निवासाची आधीच व्यवस्था करण्यात आली आहे.