इंदौर – गेले तीन आठवडे एका गुन्ह्यात कारागृहात असलेल्या एका वकिल कैद्याने महिला न्यायाधिशाला अश्लिल बर्थ डे मेसेज पाठवल्याने मोठेच वादळी प्रकरण मध्यप्रदेशात उद्भवले आहे.
स्थानिक न्यायालयाकडून त्याला जामीन मंजुर न झाल्याने त्याने जामीनासाठी सध्या हायकोर्टात अर्ज केला आहे.
त्याने संबंधीत न्यायालयाच्या महिला न्यायाधिशाला इमेल वरून तिच्या वाढदिवसाच्या निमीत्त एक अश्लिल संदेश पाठवला आहे. या महिला न्यायाधिशाचा फोटो त्याने फेसबुकवरून डाऊन लोड करून घेतला आणि त्याचे एक ग्रीटिंग कार्ड तयार करून त्यावर त्याने त्यांना हा अश्लिल संदेश पाठवला आहे.
त्याप्रकरणीही वेगळा गुन्हा त्याच्या विरोधात लागू करण्यात आला असून त्यात त्याच्यावर विनयभंगाची कलमे लावण्यात आली आहेत.