मुंबई – परिणिती चोप्राचा लीड रोल असलेला आणि बॅडमिंटन क्वीन साईना नेहवालचा बायोपिक “साईना’ याच महिन्यात 26 मार्चला रिलीज होणार आहे. स्वतः परिणितीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. तिने “साईना’चे फर्स्ट लुक पोस्टर देखील रिलीज केले आहे.
View this post on Instagram
या पोस्टरमध्ये मनगटावर तिरंगी बॅन्ड बांधलेला एक हात बॅडमिंटनचे शटल झेलण्यासाठी उंचावला असल्याचे दिसते आहे. साईना नेहवालचे बॅडमिंटनवरचे प्रेम, निष्ठा, मानेच्या दुखापतीवर तिने केलेली मात, कठोर परीश्रम आणि अखेर मिळवलेले यश या सगळ्या प्रवासाचा सांगोपांग आढावा घेतलेला असणार आहे.
View this post on Instagram
अलीकडेच परिणितीचा “द गर्ल ऑन द ट्रेन’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. याच नावाचा सिनेमा 2016 मध्ये हॉलीवूडमध्येही बनून गेला आहे. त्यामध्ये एमिली ब्लंट लीड रोलमध्ये होती. हिंदी आणि इंग्रजीमधील हे दोन्ही सिनेमे “द गर्ल ऑन द ट्रेन’ याच नावाच्या इंग्रजी पुस्तकावर आधारलेले आहेत.
View this post on Instagram
लागोपाठच्या दोन महिन्यात दोन महत्त्वाचे सिनेमे प्रेक्षकांसमोर येत असल्याचे परिणिती भलतीच खूष असणार. त्यातही “साईना’ ही स्पोर्टस फिल्म असल्याने त्याच्याकडून परिणितीला विशेष अपेक्षा असणार हे, उघड आहे.
View this post on Instagram