उर्वशी रौतेलाने नुकताच आपला 27 वा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा केला. तिने एका हॉटेलमध्ये चक्क 10 किलो कांदे कापून आपला वाढदिवस साजरा केला. हे कांदे कापता कापता उर्वशीचे खूपच हाल झाले. या अनोख्या उपक्रमाचा एक व्हिडिओ बनवून उर्वशीने तो सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे.
View this post on Instagram
या उपक्रमातून आपला वाढदिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा झाल्याची प्रतिक्रिया उर्वशीने दिली आहे. आपल्या वाढदिवशी काही तरी चांगले काम करायचेच, असा संकल्प उर्वशीने केला असावा, असे हा व्हिडिओ बघताना वाटते. “आपल्याकडून 10 किलो कांदे कापून घेतल्याबद्दल तिने आपल्या चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत.
View this post on Instagram
हे काम केवळ तुम्हीच माझ्याकडून करून घेऊ शकला असता. आज कांद्यांनी मला रडवले आहे. एक दिवस मीदेखील कांद्यांना रडवेन.’ असे तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हे कांदे कापताना उर्वशीने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत 32 लाख रुपये आहे. एवढा महाग ड्रेस घालून चक्क कांदे कापण्याचा उद्योग करण्यामागचे नेमके कारण मात्र उर्वशीने सांगितले नाही. यामागचे काय लॉजिक आहे, ते तिलाच ठाऊक. काही दिवसांपूर्वी “वो चांद कहांसे लाओगी’ हा उर्वशीचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. त्यामध्ये तिने टीव्ही ऍक्टर मोहसीन खानबरोबर काम केले आहे.