मुंबई – बॉलीवूडमधील चित्रपट निर्माता सुरज बडजात्या यांच्या चित्रपटाची नावे थोडीसी वेगळी असतात. जसे की, “मैंने प्यार किया’, “हम आपने हैं कोन’, “मैं प्रेम की दिवानी हूं’, “प्रेम रतन धन पायो’. सूरज यांच्या चित्रपटाचे नाव भले मोठे लांबलचक असते.
मात्र, आगामी चित्रपटाचे नाव खूपच विचित्र असून विशेष म्हणजे ते छोटेदेखील आहे. “ऊंचाई’ असे त्याचे शीर्षक निश्चित करण्यात आले आहे.
या चित्रपटात अमिताभ बच्चन, बोमन ईरानी आणि अनुपम खेर यासारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच आणखी एक कलाकार जोडला जाण्याची शक्यता आहे. अमिताभ आणि सूरज हे पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहेत. यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
सूरज बडजात्या यांचा हा चित्रपट मैत्रीवर आधारित असल्याचे समजते. या तिघा जणांची मैत्री दाखविण्यात येणार असून आहे. हा चित्रपट यांच्या आपल्या स्वअनुभवावर आधारित असणार आहे.
“ऊंचाई’चे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हा चित्रपट 4-5 महिन्यात पूर्ण करण्याची निर्मात्यांची योजना असून तो पुढील वर्षी 2022मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
दरम्यान, सूरज यांचा आवडता अभिनेता सलमान खान हा पाहुणा कलाकार म्हणून झळकण्याची शक्यता आहे. यात सलमानची छोटीशी भूमिका असली तरी ती निर्णायक असणार आहे.