पुणे – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची येत्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली.
अशा पराक्रमी आणि बेधडकपणे लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे शहरात भित्ति चित्र तयार करण्यात आलं असून, हे संपूर्ण भारतातील सर्वात मोठं भित्ति चित्र आहे. नारायण पेठेत निरंजन बाळासाहेब दाभेकर यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारन्यात आलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्तिचित्रास WORLD RECORD OF INDIA, government of india यांच्या कडुन हे महाराजांचे सर्वात मोठे भित्ति चित्र याचि मान्यता दिली गेली आहे.