श्रीनगर/नवी दिल्ली – कतारमधून आलेल्या जैश ए महंमदच्या दहशतवाद्याला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. जम्मू काश्मिर पोलिसांनी ही कारवाई केली.
मुनीब अहमद सोफी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मिरच्या बेजबेहरा भागातील बिलाल अहमद सोदी यांचा मुलगा आहे. कुलगावमध्ये गेल्यावर्षी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी वालीद भाई याच्यासाठी तो काम करत असे, काश्मिर पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे.
जैश ए महंमदच्या कारवायांसाठी त्याचे सहकारी काश्मिरमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून निधीसंकलन करत असत. तो निधी कतारमध्ये असणाऱ्या सोफीकडे दिला जात असे. त्याद्वारे पाकिस्तानातील जैशच्या माध्यमातून शस्त्र करत असल्याचा सोफीवर आरोप ठेवण्यात आला आहे.