मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्यावर पक्षात सध्या मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत आहे. त्याबाबत मनसेने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित ठाकरेंचं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे. सादर केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये अनेक सामाजिक मुद्यावर अमित ठाकरेंनी केलेल्या कामाची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे
दरम्यान, आरे कॉलनी आंदोलनात सहभाग घेत,अनेक संघटनांच्या सहाय्याने हा मुद्दा निकालात काढला. मेडिकल क्षेत्रातील डाॅक्टर्स , नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घेत पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राजसरकारकडे केली. डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला शेकडो पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन दिले. लॉक डाउन च्या काळात पुण्यात अडकलेल्या एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थी घरी सुखरुप पोहोचले.शासन आदेश मराठीतच काढले जावेत याकडे अमितजी ठाकरे यांनी सरकारचं/ प्रशासनाचं लक्ष वेधलं अशा एक ना अनेक कामाचा लेखाजोखा या कार्डमध्ये दिला गेला आहे.