नवी दिल्ली – सिक्सरकिंग युवराजसिंग याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची परवानगी बीसीसीआयने नाकारली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती गेतल्यावर युवराजने परदेशातील काही टी-20 लीगमध्ये खेळ केला होता, त्यामुळेच ही परवानगी देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.
पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव पुनित बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता व पंजाब संघासह सरावातही सहभागी झाला होता. त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली होती. मात्र, त्याला बीसीसीआयने नकार दिला आहे.
नव्या वर्षात होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत तो खेळणार होता. त्याचा पंजाब संघटनेने संभाव्य 30 खेळाडूंमध्येही समावेश केला होता. मात्र, बीसीसीआयने परवानगी नाकारल्याने त्याचे पुनरागमन करण्याचे स्वप्न भंग झाले आहे.