पुणे – मध्य रेल्वेकडून आणखी तीन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे-एर्नाकुलम या गाडीचा समावेश आहे.
मध्य रेल्वेकडून 31 जानेवारीला उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यासह पुणे विभागातून हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस- हुबळी एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. तर, यशवंतपूर-लातूर-यशवंतपूर आठवड्यातून तीनवेळा धावणार आहे.
पुणे-एर्नाकुलम ही द्वी साप्ताहिक सूपरफास्ट उत्सव विशेष गाडी 31 जानेवारीपर्यंत बुधवार आणि रविवारी धावणार आहे. तर, एर्नाकुलम-पुणे गाडी दर शुक्रवारी आणि मंगळवारी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.