बिजिंग – चीनच्या शेनयांग प्रांतात भारतातून आयात केलेल्या गॅटवलेल्या माशांची दोन पाकिटांमध्ये करोना विषाणू सापडल्याचा दावा चीनच्या सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या ग्लोबल टाईम्सने केला आहे. हा दावा भारतीय उत्पादनांविरोधात जगभरात मन कलुषित करण्यासाठी केला जात असल्याचा संशय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हे मासे स्थानिक बाजारपेठेत जाण्यापुर्वी त्याची तपासणी करण्यात आली, अशी पुस्तीही ग्लोबल टाईम्सने दिली आहे. शेनयांग येथे प्रशासनाने साथरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू केली आहे.
यापुर्वी वुहानमध्ये गोठवलेल्या अन्नाच्या तीन पाकिटांमध्ये करोनाचे विषाणू नोव्हेंबर महिन्यात आढळून आले होते. या तीनपैकी दोन पाकिटे ब्रअझिलमधून आयात करण्यात आले गोठवलेल्या मांसाची असल्याचा दावा वुहान आरोग्य प्रशासनाने केला होता. तर तिसरे पाकिट व्हिएतनामममधील कोल्ड स्टोरेकमधून आणल्याचे सांगण्यात आले होते.