नवी दिल्ली – राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या संघाच्या सभेत त्यांच्या निवडीचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.
या आधीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
दांडेगावकर हे सध्या महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आहेत. ते पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. व ते राज्याचे माजी मंत्रीही आहेत. साखर कारखानदारी क्षेत्राचा त्यांना चांगला अभ्यास असून या क्षेत्रातील विविध पैलूंवर त्यांनी काम केले आहे.