कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात एका भोंदू महाराजाने एका विवाहितेला घरावरील झालेली करणी आणि सोन्याच्या खजिना मिळवून देण्याच्या बहण्याने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली.
या संदर्भात भोंदू महाराज बाळू धोंडीबा दळवी याच्यासह लक्ष्मण सुतार आणि सावंतवाडी येथील दोन ईसमांविरुद्ध जादूटोणा, अघोरी कृत्य करून शारीरिक संबंध ठेवणे बाबतचा गुन्हा नोंद झाला आहे.
संशयित बाळू धोंडीबा दळवी यांनी नेसरी येथील एका विवाहितेला माझ्याकडे दैवी व अलौकिक शक्ती असून मी बाळूमामाचा अवतार आहे असे सांगितले. तुमच्या घरावर करणी झाली आहे. तसेच तुमच्या घरात सोन्याचा खजिना आहे. तो मी तुम्हाला मिळवून देतो. त्यासाठी तुम्ही मी जे सांगतो ते ऐका. असे सांगून अनिष्ट व अघोरी प्रकारे जादूटोणा केला.
तसेच बाळू दळवी यांनी विवाहितेच्या राहत्या घरी डिसेंबर 2014 ते जानेवारी 2020 रोजी पर्यंत संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. म्हणून संशयित बाळू दळवी याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. तर आज बाळू दळवी यास कोर्टात हजर केले असता त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अधिक तपास गडहिंग्लज विभागाचे उपअधीक्षक गणेश इंगळे करीत आहेत.