कोल्हापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आठवणी सांगताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. 2009 साली विधानसभा निवडणुकीवेळी जातीय दंगल भडकली.
या निवडणुकीतही शरद पवार यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून विधानसभेसाठी संधी दिली. या निवडणुकीत तब्बल 42 हजार मतांनी आपण विजयी झालो.
शरद पवार यांनी आपल्यावर नेहमीच प्रेम आणि विश्वास दाखवला, या आठवणींना उजाळा देताना मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना यावेळी रडू कोसळले. मंत्री मुश्रीफ हे भावनिक झाल्याने सभागृहात देखील शांतता पसरली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात शाहू सांस्कृतिक मंदिर येथे व्हच्यूअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.