मुंबई – करोना व्हायरसवरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात विकासदराला चालना देण्याचे संकेत मिळत आहेत. या कारणामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोमवारी शेअरबाजार निर्देशांकामध्ये वाढ झाली ( stock market news today ) .
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market news ) सेन्सेक्स ( sensex today ) 347 अंकांनी म्हणजे 0.77 टक्क्यांनी वाढून 45,426 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ( national stock exchange ) निफ्टी ( nse nifty ) 97 अंकानी वाढून 13,355 या विक्रमी पातळीवर बंद झाला.
निफ्टी आज सलग पाचव्या दिवशी वाढला. लस उपलब्ध होणार असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने वाटचाल करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
आज झालेल्या खरेदीचा फायदा एअरटेल, एचडीएफसी, आयटीसी, स्टेट बॅंक, सन फार्मा, ओएनजीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांना झाला. मात्र कोटक बॅंक, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंकेच्या शेअरची विक्री होऊन गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला.