नवी दिल्ली – पोर्तुगालने घरच्या मैदानावर एंडोराला 7-0 ने हरवले. लिस्बनमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालकडून पेड्रो नेटोने आठव्या, पॉलिन्होने 29 व्या व 61 व्या, रेनाटो सांचेसने 56 व्या, क्रिस्टियानो रोनाल्डोने 85 व्या, जोआओ फेलिक्सने 88 व्या मिनिटाला गोल केला.
एंडोराच्या गार्सिलाने 76 व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला. हा रोनाल्डोचा पोर्तुगालसाठी 102 वा गोल होता. रोनाल्डो सर्वाधिक गोल करण्याच्या इराणच्या एली डेईच्या विक्रमापासून सात गोल दूर आहे. पोर्तुगालने एंडोराला सलग सहाव्यांदा मात दिली.