नवी दिल्ली – अॅमेझॉन वेब सर्विसेस ही कंपनी तेलंगणा राज्यात आपले दुसरे डेटा सेंटर सुरू करणार असून यात 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव यांनी ही माहिती दिली.
तेलंगणा राज्यामध्ये या क्षेत्रात रोजगारनिर्मितीसाठी मोठा वाव आहे. तेलंगणा राज्याने या कंपनीबरोबर प्रदीर्घकाळ चर्चा केल्यानंतर हा व्यवहार झाला आहे.