अहमदाबाद – गुजरातमधील कच्छ खाडी परिसरात 9 पाकिस्तानी मासेमारी नौका ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा बल म्हणजेच बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या नौका जप्त केल्यानंतर शेजारील देशाच्या अशा आणखी काही नौका भारतीय हद्दीत घुसल्या आहेत का हे शोधण्यासाठी आखाती प्रदेशात बीएसएफच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
बीएसएफचे गुजरात फ्रंटियर इंस्पेक्टर जनरल जीएस मलिक म्हणाले, नियमित टेहाळणी दरम्यान, बीएसएफच्या जवानांना हरामी नाला परिसरात 9 मासेमारी नौका आढळल्या. बीएसएफच्या गस्त घालत असलेल्या नौका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या. या कारवाईत 6 पाकिस्तानी मच्छिमाराला पकडण्यात यश आले आहे.