मुंबई – अमेरिकेबरोबर आज युरोपियन आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही शुक्रवारी तुफान विक्री होऊन शेअर निर्देशांकांची मोठ्या प्रमाणात हाणी झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 773 अंकांनी कमी होऊन 58,152 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 231 अंकांनी म्हणजे 1.31 टक्क्यांनी कमी होऊन 17,374 अंकांवर बंद झाला.
गेल्या आठवड्यामध्ये बॅंका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे शेअर वाढले होते. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. महिंद्रा कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर इन्फोसीस, एचसीएल टेक, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ नोंदली गेली. इंडस इंड बॅंक, एनटीपीसी, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडी वाढ झाली. अमेरिका आणि युरोपातील व्याजदर वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूक दाराकडून गुंतवणूक काढून घेणे चालूच असून काल या गुंतवणूकदारानी 1,732 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.
3.91 लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजार निर्देशांकांत आज जवळजवळ दीड टक्क्यांची घट झाल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य एकाच दिवसात 3.91 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्देशांक वाढले होते. मात्र शुक्रवारी जागतिक शेअर बाजारात विक्री झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही तुफान विक्री झाली.