पुणे – शहरात सोमवारी 876 नवीन बाधित आढळून आले. मात्र, गेल्या 24 तासांत नमुने तपासणी संख्या कमी झाल्यामुळे आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ही बाधित संख्या कमी दिसते. तर करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक 1 हजार 384 इतकी आहे. दरम्यान, करोनामुळे 56 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये शहर हद्दीतील 37, तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 19 जणांचा समावेश आहे.
पुणे शहरातील बाधित संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर आली आहे. वाढती गर्दी, नियमांचे पालन न करणे यामुळे पाच दिवसांपासून पुन्हा बाधित संख्या वाढत आहे.
सोमवारी (दि. 31) दिवसभरात 2 हजार 847 संशियांची नमुने तपासणी करण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत एकूण 78 हजार 70 जण बरे होवून घरी गेले आहेत. सद्यस्थितीत शहरातील विविध रूग्णालयांत 14 हजार 999 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 884 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 527 बाधितांना व्हेंटीलेटर लावले आहे. तर 357 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.