पिंपरी, (प्रतिनिधी) – संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वाल्हेकरवाडी शाखेच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे रविवारी (दि.18) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 84 जणांनी रक्तदान केले. विलेपार्ले, मुंबई येथील संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलित केले.
या शिबिराचे उदघाटन पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. दरम्यान वाल्हेकरवाडी विभागातील नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. मिशनचे संयोजक गिरधारीलाल मतनानी, क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार वाल्हेकरवाडी शाखाप्रमुख डॉ. रामचंद्र लाड यांनी मानले.