भारतात दिवसभरात 8 हजार नवीन करोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – गेल्या 24 तासात भारतात 10,967 रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3 कोटी 3 लाख 88 हजार 797 झाली आहे. गेल्या 24 तासात 8,318 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे.

रोगमुक्ती दर सध्या 98.34 टक्के आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे.
भारतात सध्या 1 लाख 7 हजार 19 इतके सक्रीय कोविड रुग्ण आहेत. ही गेल्या 541 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1 टक्‍क्‍यापेक्षा कमी असून सध्या हे प्रमाण 0.31 टक्‍क्‍यांइतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.86 टक्के असून गेले 54 दिवस हा दर 2 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.88 टक्के असून गेले 13 दिवस हा दर 1 टक्‍क्‍याहून कमी आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 63 कोटी 82 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.