ठाणे जिल्ह्यात 4 वर्षात 37 बोगस डॉक्‍टर

ठाणे – ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये 37 बोगस डॉक्‍टर आढळून आले आहेत. त्यापैकी 31 डॉक्‍टरांविरोधातील प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिली. हे बोगस डॉक्‍चर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण आणि मुरबाड या 5 तालुक्‍यांमध्ये आढढळून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील बोगस डॉक्‍टर शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ठाणे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

वैद्यकीय व्यवसायिकांच्या व्यवसायाला ना हकरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा नगर पंचायतीने ही कागदपत्रे पडताळणीसाठी तालुका पातळीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवून द्यावीत, अशी सूचना यावेळी देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.