राज्यात दिवसभरात 707 करोनाबाधितांची नोंद; 7 ओमायक्रॉनच्या रुग्णांचा समावेश

मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 707 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 677 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 782 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. यात 7 ओमायक्रॉनच्या रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7151 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 78 हजार 858 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 916 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,60,78,616 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत आज 213 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 210 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 115 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईत आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर सध्या 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत सध्या 1 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.