शिर्डी – साईबाबांच्या दर्शनासाठी 25 एप्रिल ते 15 जून या काळात शिर्डीत आलेल्या सुमारे 26 लाख भाविकांनी सुमारे 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रुपयांचे दान साईंच्या झोळीत अर्पण केले. सशुल्क दर्शन आणि आरतीद्वारे 11 कोटी 55 लाख 6 हजार 997 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
साईबाबांना दोन महिन्यांत देणगी काउंटर – 25 कोटी 89 लाख 70 हजार 382, दक्षिणा पेटी – 9 कोटी 83 लाख 32 हजार 842, डेबिट क्रेडिट कार्डद्वारे – 5 कोटी 15 लाख 28 हजार 755, ऑनलाइन देणगी – 3 कोटी 34 लाख 44 हजार 543, चेक, डीडीद्वारे – 1 कोटी 82 लाख 61 हजार 806, मनिऑर्डरद्वारे – 27 लाख 37 हजार 19, सोने 2193.440 ग्रॅम – 1 कोटी 17 लाख 59 हजार 125, चांदी 52121 ग्रॅम – 28 लाख 49 हजार 88 रुपये. सशुल्क दर्शन व आरतीद्वारे सशुल्क दर्शन पास – 8 कोटी 30 लाख 57 हजार 997, सशुल्क आरती पास – 3 कोटी 24 लाख 49 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. दर्शन रांगेद्वारे याच काळात 21 लाख 9 हजार 523 भाविकांनी दर्शन घेतले.
दोन महिन्यांत अडीच कोटी
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2 हजार रुपयांच्या नोटाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर 20 मे ते 15 जूनपर्यंत साईंच्या दानात 2 हजारांच्या 12 हजार नोटा जमा झाल्या. या माध्यमातून 2 कोटी 40 लाखांचे दान मिळाले आहे.