नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात आता करोनाचा कहर सुरु झाला आहे. बेजबादार नागरीकांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 559 नवे रुग्ण सापडले असून, उपचार घेणार्यांची संख्याही आता अडीच हजार पार झाली आहे. त्यासोबत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पुन्हा एकदा घसरली आहे. ही बाब वैद्यकीय विभागाच्या हवाल्याने आज प्रशासनातर्फे जाहीर झालेल्या मेडीकल बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज 235 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 265 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.40 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 559 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 546 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 298, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 241 आणि अँटीजेन चाचणीत 20 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 143, अकोले 16, जामखेड 22, कर्जत 03, कोपरगाव 37, नगर ग्रामीण 08, नेवासा 05, पारनेर 09, पाथर्डी 03, राहाता 02, राहुरी 02, संगमनेर 18, शेवगाव 12, श्रीरामपूर 10, कॅन्टोन्मेंट 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 74, अकोले 11, जामखेड 02, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 06, नेवासा 09, पारनेर 06, पाथर्डी 05, राहाता 34, राहुरी 12, संगमनेर 37, शेवगाव 09, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 20 जण बाधित आढळुन आले. मनपा 12, नेवासा 01, राहाता 03, श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 58, अकोले 01, जामखेड 06, कर्जत 16, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 08, नेवासा 13, पारनेर 16, पाथर्डी 12, राहाता 30, राहुरी 07, संगमनेर 27, शेवगाव 05, श्रीगोंदा 01 श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 07 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.