- नवीन 251 रुग्णांची नोंद :
- 15 मृत्यूंची नोंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 555 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांजवळ आली आहे. तर नवीन 251 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
शुक्रवारी (दि. 11) शहरात 251 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 53 हजार 473 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 15 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 8 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6324 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 555 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 734 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4336 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1701 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 828 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2529 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 9 जणांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 18 करोनाबाधित रुग्णांपैकी 9 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. रुग्णालयात शुक्रवारी (दि. 11) नव्याने 4 बाधित रुग्ण आढळले.बाधित रुग्ण हे औंध, तळेगाव या परिसरातील रहिवाशी आहेत. त्यामध्ये 2 पुरूष आणि 2 महिला रुग्णांचा समावेश आहे. दापोडी येथील 58 वर्षीय पुरुष रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून 1 हजार 368 रूग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 350 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.