बावडा -परिसरात गुरुवारी (दि. 25) मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणत पाऊस झाला. या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे इंदापूर तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार बावडा (ता. इंदापूर) येथे 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून जून महिन्यात एवढा पाऊस कधीच झाला नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. शुक्रवारी सकाळी शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी पाहावयास मिळत होते. या पावसामुळे छोटे नाले भरून वाहू लागले आहेत.