वाघळवाडी-वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 38 जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोणत्याही कामासाठी सार्वजनिक ठिकाणी येताना सर्वांनी मास्क लावावे. तसेच कोणीही विनाकारण बाहेर फिरु, नये असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.