नवी दिल्ली – गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क ते दिल्ली या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी करण्याचा अघोरी प्रकार घडला होता. या प्रकरणी संबंधीत प्रवाशाला एअर इंडियाने 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एअर इंडियाने एक चौकशी समितीही स्थापन केली आहे.
इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करणार – देवेंद्र फडणवीस
या प्रकरणी नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे की,त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेबद्दल एअरलाइनकडून अहवाल मागवला आहे आणि या प्रकरणात संबंधीतांवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही या प्राधिकरणाने म्हटले आहे. एअरलाइनने सांगितले की त्यांनी या घटनेबद्दल पोलिस तक्रारही दाखल केली आहे.
“चांद्रयान-3’चे लवकरच प्रेक्षपण; इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली माहिती
26 नोव्हेंबर रोजी, एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान एका महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी करण्याचा भयंकर प्रकार घडला होता. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, आम्ही या घटनेविषयी अतिशय गांभीर्याने विचार करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, एअर इंडियाने ही उड्डाण बंदी कधी पासून लागू करण्यात आली याबाबत तपशील देण्यास नकार दिला.आम्ही या प्रक्रियेदरम्यान पीडित प्रवासी आणि तिच्या कुटुंबाच्या नियमित संपर्कात आहोत असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.