होम फर्स्ट फायनान्सच्या IPOला 25 पट मागणी

नवी दिल्ली – होम फर्स्ट फायनान्स कंपनीने भांडवल उभारणीसाठी गेल्या आठवड्यात आयपीओ जारी केला होता. यासाठी मागणी नोंदविण्यात करिता सोमवार शेवटचा दिवस होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आयपीओला 25.57 पट मागणी नोंदली गेली आहे.

आयपीओअंतर्गतच्या शेअरची किंमत 517 ते 518 रुपये इतकी होती. याद्वारे मिळालेल्या भांडवलाचा उपयोग कंपनी कामाच्या विस्तारीकरणासाठी करणार आहे. लवकरच या कंपनीचे शेअर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आवरून नोंदले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.